शबनम न्युज | पिंपळे सौदागर
गेल्या बर्याच काळापासून प्रलंभीत असलेल्या पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॅान रस्त्याचे अद्ययावत पध्दतीने विकास करण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.या संदर्भात आज दि.२८/०७/२०२३ रोजी नगरसेवक शत्रुघ्न काटे आणि संबंधीत पालिका स्थापत्य प्रकल्प अधिकारी ,आर्किटेक्ट व कन्सलटंन्ट यांच्या सोबत एक बैठक पार पडली.
सदर बैठकीत नियोजित आराखड्यावर सविस्तर चर्चा झाली आणि नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी याकामाचे निविदा लवकरात लवकर काढावे आणि काम सुरू करावे अश्या सूचनाही संबंधित विभाग प्रमुख आर्किटेक्ट आणि कन्सलटंन्ट यांना दिले आहेत . सदर काम सुरू करण्यापूर्वी भूमिगत असलेल्या स्टोर्म लाईन,पाणीपुरवठा लाईन , MSEB केबल्स याच्याशी निगडीत असलेल्या उपाययोजना करण्याच्या सूचना नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी दिले आहे. या बैठकी दरम्यान स्थापत्य प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता संध्या वाघ, उपअभियंता संजय काशीद, इन्फ्रा कंन्सलटंट कंपीनीचे सल्लागार लक्ष्मीकांत पतंगे, रणजीत कोल्हे व इतर कर्मचारी उपस्थित होते.