शबनम न्युज | आकुर्डी
आकुर्डीच्या विकासाचे शिल्पकार दिवंगत नगरसेवक जावेद शेख यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त सोमवार दिनांक 31 जुलै रोजी आकुर्डी येथे भव्य रक्तदान शिबिर तसेच मोफत नेत्र तपासणी शिबिर, आणि मोफत फ्री बॉडी चेकिंग व मोफत हिमोग्लोबिन तपासणी सह अनीमिया मुक्त भारत अभियान आणि क्षय रोग जनजागृति अभियान अशा आरोग्य विषयक कार्यक्रमाचे आयोजन झाकिर रमजान शेख यांच्या वतीने करण्यात आले आहे.
तसेच नागरिकांनी सोमवार दिनांक ३१ जुलै २०२३ रोजी सकाळी 9 ते 4 यावेळेत हॉटेल सिल्वर सेवन ,बजाज पेट्रोल पंप मागे आकुर्डी येथे संपर्क साधावा असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पिंपरी विधानसभेचे कार्याध्यक्ष इखलास सय्यद यांनी केले आहे .
Advertisement