शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड शहरातील पिपंळे सौदागर येथील कुणाल आयकॅान रोड वरील शिवार चौक ते छत्रपती युवा चौक पर्यंत रस्त्याचे अद्ययावत पध्दतीने विकास करण्यात येणार आहे.त्याचे काम लवकरच चालु करण्यात येणार असल्याने त्याबाबत माजी विरोध पक्ष नेते नाना काटे यांनी संबंधीत पालिका स्थापत्य प्रकल्प अधिकारी व सल्लागार कंपनी यांच्या सोबत एक तातडीची बैठक घेतली .
या कामामध्ये पुर्वी असलेल्या संपुर्ण ड्रेनेज लाईन, स्ट्रॅाम वॅाटर लाईन नविन टाकण्यात येणार आहे. या कामासाठी १ ते १.५ वर्षांचा कालावधी लागणार आहे. या रस्त्यावर वाहनाची व नागरिकांची वर्दळ जास्त असल्याने या रस्त्याचे काम दोन टप्यात करण्यात येणार असुन नागरिकांना याचा त्रास होऊ नये म्हणुन वाहतुकीसाठी नविन तात्पुरते स्वरूपात पर्याय देखील उपल्बध करून देण्यात येतील.
या कामासंदर्भात नागरिकांच्या खुप तक्रारी येत असुन लवकरात लवकर या कामाचे टेंडर काढुन काम पुर्ण करावे अशा सुचना नाना काटे यांनी अधिकाऱ्यांना यावेळी केल्या.
या बैठकी दरम्यान संबधित रस्त्याचे स्थापत्य प्रकल्प विभागाचे अधिकारी कार्यकारी अभियंता श्रीमती संध्या वाघ, उपअभियंता श्री. संजय काशीद, इन्फ्रा कंन्सलटंट कंपीनी चे सल्लागार श्री. लक्ष्मीकांत पतंगे, श्री. रणजीत कोल्हे, व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.