शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर उपाध्यक्ष आतिश बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिरचे आयोजन करण्यात आले आहे. सदरचे आयोजन बुधवार दिनांक 2 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच दरम्यान, अतिश बारणे यांचे जनसंपर्क कार्यालय मोशी येथे होणार आहे. या शिबिरामध्ये रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास एक हेल्मेट भेट दिली जाणार आहे.
नुकतेच दरड कोसळून इर्शाळवाडी येथे अनेक कुटुंब उध्वस्त झाली. या कुटुंबांचे पुनर्वसन व्हावे याकरिता अतिश बारणे यांच्या वतीने मदत निधी देण्यात आला आहे. सदरचा निधी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अतिश बारणे यांनी सुपूर्द केला आहे. आपल्या या वाढदिवसानिमित्त मदत नव्हे कर्तव्य या भावनेतून आतिश बारणे यांच्याकडून हा एक स्तुत्य सामाजिक बांधिलकी उपक्रम राबविण्यात आला.
दोन ऑगस्ट रोजी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सफाई कर्मचाऱ्यांना या निमित्ताने वाफेचे मशीन वाटप करण्यात येणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना छत्रीवाटपही करण्यात येणार आहे.
सदर मोफत आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिर मध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घेऊन आपल्या आरोग्याची तपासणी करावी, तसेच रक्तदात्यांनी आपले रक्तदान करावे, असे आवाहन अतिश बारणे यांच्या सक्षम सोशल फाउंडेशन तसेच अतिशय बारणे पाटील युवा मंच वतीने करण्यात आले आहे.