शबनम न्युज | चिंचवड
चिंचवड गावातील दहावी व बारावी तसेच इतर शाखातून गुणवंत झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम करिअर मार्गदर्शन शिबिर चिंचवड मध्ये योगदान प्रतिष्ठान व नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांच्या वतीने नुकताच संपन्न झाला
चिंचवड विधानसभेच्या आमदार अश्विनी ताई लक्ष्मण भाऊ जगताप व नवनिर्वाचित भाजपा शहराध्यक्ष शंकर भाऊ जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न करण्यात आला
यावेळी विवेक वेलवणकर यांचे -“दहावी व बारावीनंतर शाखा निवड” प्रवेश करण्यासाठी मोफत मार्गदर्शक असे पुस्तक मोफत देण्यात आले यावेळी स्वतः श्री विवेक वेलणकर यांनी विद्यार्थ्यांना पुढील आयुष्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन व दिशा देण्याचे मार्गदर्शन केले.
चिंचवड विधानसभेतील दहावी बारावी व इतर शाखांचे गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
या वेळी सेजल राठी महाराष्ट्र मध्ये नेट परीक्षेमध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थिनीचा सत्कार आमदार अश्विनीताई जगताप व शहराध्यक्ष शंकरभाऊ जगताप यांच्या हस्ते करण्यात आला.
तसेच दहावी मध्ये 99% मार्क मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
तसेच प्रदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा देखील गुणगौरव करण्यात आला यावेळी शहराध्यक्ष शंकरभाऊ जगताप यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन व पुढील शैक्षणिक वाटचालीस यशस्वी शुभेच्छा दिल्या.
245 उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला
या कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक संघाचे रमेश इनामदार,माजी नगरसेविका कांताताई मोंढे, महिला अध्यक्ष उज्वला गावडे, भाजपा जेष्ठ नेते महेशजी कुलकर्णी सामाजिक कार्यकर्ते गतिराम भोईर, मधुकर बच्चे, संदीप पंडित, प्रा संजीवनी पांडे, माधुरीताई गुरव, श्रीराम परबत गुरुजी, रवींद्र प्रभुणे, हरिभाऊ मोहिते, कृष्णकांत काकडे,
अरुण नागवडे, यशवंत काकडे व प्रतिष्ठानचे ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर हांडे सर तर आभार विजयकुमार बोरसे सर यांनी केले
क्रमाचे यशस्वी आयोजन योगदान प्रतिष्ठान व नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांनी केले