शबनम न्युज | पुणे
पुण्यातील सुखसागर येथील वसंत रामचंद्र थोरवे यांचे 29 जुलै 2023 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 86 वर्षाचे होते. पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे संचालक हर्षल थोरवे यांचे ते चुलते होते. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, वहिनी, पुतण्या, सून, नातवंडे असा परिवार आहे.
वसंत थोरवे हे उपप्रादेशिक रोजगार अधिकारी एम्प्लॉयमेंट एक्सचेंजचे उपसंचालक या पदावरून सेवानिवृत्त झालेले होते. त्यांची दशक्रिया विधी सोमवार दिनांक 7 ऑगस्ट 2023 रोजी कात्रज येथे होणार आहे.
Advertisement