शबनम न्युज | पिंपरी
रहिवासी दाखला, उत्पन्नाचा दाखला, अशा प्रकारचे कोणतेही शासकीय दाखले देण्याकरिता संबंधित कार्यालयाने रेशन कार्ड ची मागणी करू नये, अशी मागणी करणारे पत्र शिवसेनेचे शहर उपप्रमुख नेताजी काशीद यांनी तहसीलदार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
सदर निवेदनात नेताजी काशीद यांनी नमूद केले आहे की, अन्न नागरी पुरवठा विभागामार्फत रेशन कार्ड कोणत्याही शासकीय प्रमाणपत्र करिता ग्राह्य धरण्यात येऊ नये, अशा प्रकारचे जीआर प्रसिद्ध केले आहे. त्यास अनुसरूनच ज्येष्ठ नागरिकांना मिळणारे प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, डोमासाईल सर्टिफिकेट अशा विविध प्रमाणपत्राकरिता दाखल्यांकरिता रेशन कार्ड मागणी करू नये, तसेच शासकीय कार्यालयाबाहेर या प्रमाणपत्राच्या कागदपत्रांच्या यादीमध्ये रेशन कार्ड वगळण्यात यावे. तसेच हे शासकीय प्रमाणपत्र देण्याचा कालावधी जो ठरविण्यात आला आहे. त्या कालावधीतच दाखले प्रमाणपत्रे नागरिकांना उपलब्ध करून द्यावी, अशी ही मागणी नेताजी काशीद यांनी आपल्या निवेदनाद्वारे केली आहे.