शबनम न्यूज प्रतिनिधी :
पावसाचा जोर सध्या सुरु आहे या पावसाळ्यात अनेक अप्रिय घटना घडत आहेत पावसाळ्या पूर्वी करावयाची कामे प्रशासन वतीने करण्यात न आल्याने सर्वसामान्यांना अनेक अडचणी चा सामना करावा लागतोय याचा प्रतेय पिंपरी चिंचवड मध्ये आला आहे शहरातील मेहत्रे वसती परिसरातील महानगर पालिकेचा दवाखाना आहे हा दवाखाना पिंपरी चिंचवड महानगरपालिका फ प्रभागचे (स्थापत्य) अंतर्गत येतो या दवाखान्याची स्थिती अत्यंत दयनीय झाली.
आहे.दवाखान्यात पावसाचे पाणि येत असल्याने दवाखान्यात रुग्ण , डॉक्टर , नर्स यांना अनेक अडचणी निर्माण झाल्या महत्वाची कागदपत्रे पुर्ण भिजलेल्या अवस्थेत आली. दवाखान्यातील मशीनरी पावसाच्या पाण्या मुळे खराब स्थित आल्या आहे
येथील सामजिक कार्यकर्ते पांडाभाऊ साने यांना दवाखान्यातून रुग्णांच्या नातेवाईकांनी आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी संपर्क साधला. प्रसंगाची त्यांना माहिती दिली. पांडाभाऊ साने यांनी त्वरित दवाखाना गाठला. गळती लागलेल्या दवाखान्याच्या इमारतीवरील छतावर ताडपत्री टाकूली. तात्पुरती डागडुजी केली. त्यामुळे काही अंशी पावसाच्या पाण्याची गळती थांबली.
सुमारे एक लाख लोकसंख्येच्या चिखली परिसरातील नागरिकांसाठी येथील पालिकेचे सार्वजनिक आरोग्य केंद्र कणा मानले जाते. हजारो कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मिरविणारी महापालिका आरोग्य विभागावर दरवर्षी कोटय़वधी रुपयांचा खर्च करत असते. या आरोग्य केंद्रात सामान्य रुग्णांवर मोठ्या प्रमाणात उपचार होतात. त्याशिवाय प्रसूती, आंतररूग्ण विभागात मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल होतात. त्यामुळे येथील व्यवस्थापन चोख असावे हा नेहमीच आग्रह राहिला आहे.
आज सकाळी मला मनपा दवाखाना म्हेत्रेवस्ती येथून डॉक्टर व तेथील परिचारिका यांचा कॉल आला.दवाखान्यातील छतपत्र्याची दयनीय अवस्था झाली आहे त्यातून पावसाचे पाणी थेट दवाखान्यात पडत आहे. मी प्रत्यक्ष पाहणी केली तेंव्हा मला दवाखान्यातील महत्वाचे कागदपत्रे, औषधी,इतर उपकरणे पावसाच्या पाण्यानी पूर्ण भिजले होते. मी लगेचच माझ्या कार्यकर्त्याच्या मदतीने ताडपत्री कागद दवाखान्याच्या छतपत्र्यावर अंथरून पाण्याचा तात्पुरता इलाज केला.आणि लगेचच संबंधित क्षेत्रातील इंजिनियर श्री प्रतीक बसरकर साहेब यांना या बाबद कळविळे.बसरकर साहेबांनी तात्काळ नवीन पत्रे बसवू. असे मला व तेथील डॉक्टर आणि कर्मचारी यांना सांगितले. - - सामाजिक कार्यकर्ते पांडाभाऊ साने