शबनम न्यूज पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष पदी स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांचे बंधू किंवा उद्योजक शंकर शेठ जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे सदर नियुक्ती भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
आमदार महेश लांडगे यांचा शहराध्यक्ष पदाचा कार्यकाळ संपल्याने शहराच्या अध्यक्षपदी कोणाची निवड होते याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती, शहरची राजकीय परिस्थिती पाहता स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांच्याकडूनच राजकीय धडे मिळविलेले त्यांचे बंधू शंकर शेठ जगताप यांची ही निवड महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
शंकर शेठ जगताप यांना राजकीय अनुभव हे त्यांचे बंधू स्वर्गीय लक्ष्मण जगताप यांच्याकडून मिळाले आमदार अश्विनी जगताप यांच्या पोटनिवडणुकीत झालेला विजय यामध्ये शंकर शेठ जगताप यांची कामगिरी महत्त्वपूर्ण ठरली.
पिंपरी चिंचवड शहरातील आगामी महानगरपालिका लोकसभा विधानसभा निवडणुका या शंकर शेठ जगताप यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी पार पाडेल.
शंकर शेठ जगताप यांच्याही निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे,