शबनम न्यूज प्रतिनिधी
भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ काल प्रसार माध्यमांद्वारे समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली या प्रकरणी भाजप विरोधी असलेल्या नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया देत किरीट सोमय्या यांचा निषेध व्यक्त केला आहे
ठिकठिकाणी त्यांचे विरोधात निषेध आंदोलने करण्यात येत आहे , पिंपरी चिंचवड शहरातही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला किरीट सोमय्या यांच्या विरोधात आक्रमक झाल्या, शिवसेना महिलाआघाडी वतीने किरीट सोमय्या यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले या आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी सोमय्या यांच्या प्रतिमेस जोडे मारून आपला निषेध व्यक्त केला..
सदर आंदोलन शिवसेनेच्या महिला संघटिका माजी नगरसेविका सुलभा उबाळे यांच्या नेतृत्वात घेण्यात आले. यावेळी शिवसेनेच्या अनेक महिला पदाधिकारी कार्यकर्त्या यांच्या समवेत शिवसेनेचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार माजी नगरसेवक धनंजय आल्हाट, अनिल सोमवंशी,शैलेश मोरे, रावसाहेब थोरात,तुषार सहाणे, अजिंक्य उबाळे,अनिता तुतारे आशा भालेकर,कल्पना शेटे, रूपाली अल्हाट यांच्या सह अनेक महिलांनी ं आंदोलनात सहभाग घेतला.
Advertisement