शबनम न्यूज प्रतिनिधी :
पावसाचा जोर सध्या सुरु आहे या पावसाळ्यात अनेक अप्रिय घटना घडत आहेत पावसाळ्या पूर्वी करावयाची कामे प्रशासन वतीने करण्यात न आल्याने सर्वसामान्यांना अनेक अडचणी चा सामना करावा लागतोय याचा प्रतेय पिंपरी चिंचवड मध्ये आला आहे शहरातील मेहत्रे वसती परिसरातील महानगर पालिकेचा दवाखाना आहे हा दवाखाना पिंपरी चिंचवड महानगरपालिका फ प्रभागचे (स्थापत्य) अंतर्गत येतो या दवाखान्याची स्थिती अत्यंत दयनीय झाली.
आहे.दवाखान्यात पावसाचे पाणि येत असल्याने दवाखान्यात रुग्ण , डॉक्टर , नर्स यांना अनेक अडचणी निर्माण झाल्या महत्वाची कागदपत्रे पुर्ण भिजलेल्या अवस्थेत आली. दवाखान्यातील मशीनरी पावसाच्या पाण्या मुळे खराब स्थित आल्या आहे. या सर्व परिस्थितीची माहिती या भागातील शिवसेनेचे नेते नेताजी काशीद व रावसाहेब थोरात मिळाली असता त्यांनी त्वरित सदर डावखणायची पाहणी केली व दवाखाना व त्या जवळच असलेल्या पोलीस चौकी ची दुरुस्ती करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे
या बाबत प्रतिक्रिया देताना नेताजी काशीद यांनी सांगितले कि पावसाळ्या पूर्वी प्रशासनाने दवाखान्याची दुरुस्ती केली असती तर हि परिसथिती निर्माण झाली नसती सध्या आरोग्य विभागाच्या महिला कर्मचारी यांनी तुर्तास सर्व साफसफाई केले आहे. परंतु प्रशासनाने या बाबत त्वरित कार्यवाही करावी अशी मागणी प्रभाग अधीकारी, सिताराम बहुरे साहेब, विजयकुमार काळे साहेब व प्रतीक भावसार यांच्या कडे केली आहे. त्यांनी सदर दुरुस्ती चे काम लवकरच पूर्ण करणार असल्याचे सांगितले आहे. अशी माहिती नेताजी काशीद यांनी माध्यांना दिली