मा. महापौर राहुल जाधव यांच्या निवासस्थानी हवेली तालुक्यातील बैलगाडा मालकांची बैठक संपन्न
शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
कोर्टाने बंदी घातलेल्या बैलगाडा शर्यती पुन्हा चालू करण्यासाठी पिंपरी चिंचवड शहराचे मा. महापौर राहुल जाधव यांच्या निवास्थानी सोमवार दिनांक ०९.०८.२०२१ रोजी सकाळी ११ वाजता हवेली तालुक्यातील सर्व बैलगाडा मालकांची बैठक पार पडली यावेळी हवेली तालुका बैलगाडा संघटनेच्या वतीन बैलगाडा शर्यत पुन्हा चालू करण्या संदर्भात आमदार महेशदादा लांडगे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी बोलताना महेश दादा लांडगे यांनी बैलगाडा शर्यत चालू करण्यासाठी सर्वोतपरी प्रयंत्न करणार असल्याचे
सांगितले. पुढे बोलताना आमदार महेश लांडगे म्हणाले कि बैलगाडा शर्यत हा आमच्या शेतकऱ्यांचा पारंपारिक खेळ आहे काही संस्थेच्या मागणी नुसार मा कोर्टाने बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली आहे परंतु तमिळ नाडू मधील जलीकुट्टी खेळाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील विशेषतः पुणे जिल्हा आणी सातारा जिल्ह्यातील या पारंपारिक शर्यती चालू करण्या साठी सर्वपक्षीय नेत्यांनी राजकारण बाजूला ठरून या शर्यती पुन्हा चालू करण्या साठी प्रयत्न करावेत.
यावेळी मा. महापौर राहुल जाधव म्हणाले कि, शेतकरी आपल्या बैलांचा पोटच्या मुला प्रमाणे सांभाळ करतो आणी ज्यांना
बैल या प्राण्याविषयी काहीच माहित नाही असे लोकं बैलगाडा शर्यती वर बंदी घालण्याची मागणी करतात म्हणत नाव न घेता पेट या संस्थेवर टीका केली यावेळी हवेली तालूक्यातील तसेच पुणे जिल्ह्यातील अनेक बैलगाडा मालक तसेच बैलगाडा मालक संघटना मोठ्या संख्येने उपस्थित होते.