आंदोलनादरम्यान राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका जखमी
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.०६ मार्च) :- राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचं उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमापूर्वी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते आमने सामने आले होते.
पिंपरी चिंचवडमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीवर चप्पल भिरकवण्यात आल्याची घटना घडली. उद्यान उद्घाटनाला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध होता. याचदरम्यान भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. या दरम्यान जेव्हा देवेंद्र फडणवीस यांचा ताफा दाखल झाला त्या गोंधळात एका अज्ञात व्यक्तीनं चप्पल फेकली. भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने आल्यानंतर पोलिसांनी लाठीमार देखील केला. गेल्या पाच वर्षात पिंपरी चिंचवड महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याचा दावा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला होता. ते यासंबंधी निवेदन देवेंद्र फडणवीस यांना देणार होते. यावेळी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि वादाला सुरुवात झाली.
आंदोलनादरम्यान राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका शमीम पठाण जखमी
दरम्यान उद्घाटनाला राष्ट्रवादी वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले हे आंदोलन इतक्या भयंकर स्वरूपाचे रूप घेईल याचा कोणालाही अंदाज आला नव्हता मोठा पोलिस बंदोबस्त असूनही हे आंदोलन तीव्र स्वरूपाचे झाले. पोलिसांना या आंदोलनात लाठीचार्ज करावा लागला. तसेच या आंदोलनात राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका शमीम पठाण या जखमी झाल्या आहेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून ही बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली.