शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरामध्ये धुडकूस घालणाऱ्या रावण टोळी यांच्या विरोधात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने धडक मोहीम सुरू करण्यात आली होती. आतापर्यंत या कुप्रसिद्ध गॅंगच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या मोरक्यावर दहा मोका अन्वय कारवाया झाल्या असून, सर्व आरोपी येरवडा कारागृहात जेरबंद आहे. तसेच याच टोळीतील फरार आरोपी कपिल उर्फ विजय दीपक लोखंडे यास वडोदरा गुजरात येथून अटक करण्यात आली.
रावण टोळीतील फरार आरोपी कपिल हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. त्याचे लोकेशन तडीपार आरोपी सचिन गायकवाड यांच्यासोबत सातारा परिसरात आलेले होते. त्यानंतर पाटस व नंतर सिन्नर व शेवटचे लोकेशन त्याच्या राहत्या घरी बडोदरा गुजरात येथे आलेले होते. त्यानुसार एक पोलीस पथक वडोदरा गुजरात येथे पाठविले असता, तो तेथून पळून जाण्यात यशस्वी झालेला होता. तेव्हापासून चिखली पोलीस स्टेशनचे पोलीस त्याच्या मागावर होते. त्यानुसार 28 जुलै 2023 रोजी कपिल याने इंस्टाग्राम वरून चिखली परिसरात राहणाऱ्या त्याच्या मैत्रिणीला संपर्क केल्याचे पोलिसाच्या तांत्रिक विश्लेषणात दिसून आले. चिखली पोलीस ठाण्याचे पोलिसांनी तात्काळ त्याच्या मैत्रिणीला ताब्यात घेऊन तिच्या माध्यमातून कपिल लोखंडे याचा संपर्क चालू ठेवून माघ काढत वडोदरा गुजरात येथे जाऊन तेथील स्थानिक पोलीस ठाण्याच्या पोलिसांची मदत घेऊन कपिल याला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली परिसरात याच टोळीचा करण रतन रोकडे व मुंग्या उर्फ हृतिक रोकडे या भावानी आपली स्वतंत्र टोळी निर्माण करून दहशत निर्माण केलेली होती. या दोघांच्या टोळी विरोधात आत्तापर्यंत खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, कोयत्याचा, अग्नि शास्त्राचा वापर करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापत असे एकूण 21 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले होते. यापूर्वीही करण रोकडे याच्यावर मोका अंतर्गत कारवाई केलेली होती. तो सध्या जामिनावर होता. तर त्याचा भाऊ मुंग्या उर्फ ऋतिक रतन रोकडे याच्यावर सन 2021 मध्ये मोका अंतर्गत कारवाई केली असता, त्यांनी दहशतीच्या जोरावर फिर्यादीस फितूर करून मोकांमधून त्याची सुटका करून घेतलेली होती. त्यानंतर त्यास मुंबई येथे तडीपार करण्यात आलेले होते. परिसरात त्याचे वर्चस्व कायम राहावे म्हणून त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने 22 मे 2023 रोजी दुपारी 2 वाजता चिखली कमानी समोर भर चौकात गोळ्या झाडून सोन्या तापकीर नावाच्या एक मुलाची मुलाची निर्घृण पणे हत्या केलेली होती. गुन्ह्याचा कट करून त्यानुसार त्यांनी मध्य प्रदेशातून पिस्तूल विकत आणली होती. टोळीचा प्रमुख करण रोकडे याने त्याप्रमाणे सोन्या पानसरे व सिद्धांत कांबळे यांना पिस्तूल चालवण्याचे प्रशिक्षण दिले तसेच त्याच्या मदतीला रिंकू यादव व मानव रोकडे यांना वॉचक म्हणून ठेवून गुन्हाचा नियोजनबद्ध कट्टानुसार तो गोवा येथून निघून गेला, तर त्याचा भाऊ मुंग्या रोकडे यास गोवंडी मुंबई येथे तडीपार केलेले असल्याने तो मुंबई येथे निघून गेला होता. तर कटातील सहभागी असणारा तडीपार आरोपी सचिन गायकवाड हा सातारा येथे निघून गेला होता. नियोजनानुसार घटना घडली त्यावेळेस आपण पुण्यात नव्हतो, हे दाखविण्यासाठी घटनेच्या वेळेस ते पुण्यापासून दूर असणाऱ्या गोवा, भांडुप पोलीस स्टेशन सातारा पोलीस स्टेशन येथील सीसीटीव्ही कॅमेराच्या खाली थांबून राहिलेले होते. तसेच त्यांचे मोबाईल हेही त्यांनी त्यांच्या घरी चालू ठेवून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे पुराव्याची लिंक जोडणे व त्याचा गुन्हयाच्या कट्यातील सहभाग निष्पन्न करणे, पोलिसांसाठी मोठे आव्हान होते. आरोपी वारंवार त्याचे राहण्याचे ठिकाण बदलत होते. मोबाईल, सिम कार्ड दररोज बदलत होते. तसेच व्हाट्सअँप, इंस्टाग्राम, पब-जी सारख्या सोशल मीडियाचा वापर संपर्कासाठी करत होते, त्यामुळे त्यांचा शोध घेणे पोलिसांना अवघड जात होते.
तसेच गुन्हा केला नंतर गोळीबार करणारे आरोपी सातारा येथे तडीपार आरोपी सचिन गायकवाड यांच्याकडे गेलेले होते. तेथून त्यांना अटक करण्यात आली. तर मुख्य सूत्रधार आरोपी हे पळून प्रथम गोवा नंतर सातारा, बारामती, वडोदरा, मध्य प्रदेश, मथुरा शेवटी नेपाल बॉर्डरवर मधुबन, उत्तर प्रदेश येथे गेलेले होते. पोलिसांनी त्यांचा पाठलाग शेवटपर्यंत करून शेवटी ते नेपाळ बॉर्डर जवळ मधुबन उत्तर प्रदेश या ठिकाणी नेपाळमध्ये पळून जाण्याच्या तयारीत असताना, गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने व त्यांच्या पथकाने त्यांना मोठ्या जिगरीने ताब्यात घेतले. तरीही या टोळीतील आरोपी कपिल हा गुन्हा घडला पासून फरार होता. त्यालाही आता चिखली पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.
अशा प्रकाराच्या गुन्ह्यात एकूण 12 आरोपींना अटक करून त्यांच्या विरोधात मोका अंतर्गत कारवाई करून चिखली पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी चिखली परिसरात रावण टोळीचे दहशत मोडीत काढलेली आहे.
सदर कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अतिरिक्त पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, पोलीस निरीक्षक भानुदास, सहाय्यक पोलीस निरीक्षक तौफिक सय्यद ,पोलीस उपनिरीक्षक पुजारी ,कुमटकर, बारवकर ,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वडेकर, पोलीस हवालदार नागरे, टाळकर, साकोरे, जाधव, पिंजारी, केदार यांच्या पथकाने केली. तर विशेष तांत्रिक सहाय्य नागेश माळी यांनी केलेले आहे.