शबनम न्युज | हिंजवडी
पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी भागात एका 27 वर्षीय शारीरिक व्यंग असलेल्या महिलेला लग्नाची आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याने तसेच तिची 10 लाख 43 हजार रुपयांची फसवणूक केल्याने एकाच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
स्वागत मोहन विनोदी (रा. पॅव्हिलियन सोसायटी, वाकड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात भा.द.वि. कलम 376 , 506 , 504 , 406 , 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या जन्मजात शारीरिक व्यंग आहे, हे माहीत असताना देखील आरोपीने फेब्रुवारी 2021 ते 1 जून 2023 पर्यंत फिर्यादी यांच्या सोबत शारीरिक संबंध ठेवले. तसेच विवाहाचे आमिष दाखवून आणि तुला असलेल्या शारीरिक व्यंगामुळे तुझ्याशी कोणीच लग्न करू शकत नाही, मात्र मी तुझ्याशी लग्न करेल, असे वचन देऊन वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करून फिर्यादींकडून 10 लाख 43 हजार रुपये घेतले. त्यानंतर विवाह करण्यास नकार देऊन, फसवणूक करून फिर्यादी यांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली. या घटनेचा अधिक तपास हिंजवडी ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बोरकर करीत आहे.