शबनम न्यूज | प्रतिनिधी
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय डुडुळगाव आळंदी, पुणे या ठिकाणी सोमवार दिनांक ११ डिसेंबर २०२३ रोजी राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित भारत @2047 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रवचन व प्रतिमा पूजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा कैलास अस्तरकर यांनी कार्यक्रमाचा उद्देश व भूमिका या संदर्भात सविस्तर विवेचन केले.
या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य हंसराज थोरात यांनी यांनी विकसित भारत 2047 या कार्यक्रमा निमित्त मा. पंतप्रधान यांनी विकसित भारतासाठी केलेल्या कार्याचा उल्लेख करत अनेक उदाहरणे देत विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले त्यांनी आपल्या व्याख्यानातून सुरुवातीपासून त्यांनी भारत विकसित करण्याकरता पक्के घर, नळाच्या पाण्याची जोडणी, शौचालय, मोफत उपचार, मोफत अन्नधान्य, गॅस जोडणी, वीज जोडणी, बँक खाते उघडणे, पीएम किसान सन्मान निधी, पीएम फसल विमा योजना, पीएम स्वनिधी योजना, आणि पीएम स्वामित्व मालमत्ता कार्ड यासह विविध योजना याबाबत मा. पंतप्रधान यांनी विकसित भारतासाठी कसे प्रयत्न केले याबद्दल बहुमोल असे मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार मा.श्री.मयूर मुरलीधर ढमाले यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमासाठी डॉ. पांडुरंग मिसाळ,प्रा.संजीव कांबळे -रासयो कार्यक्रम अधिकारी, प्रा. सविता मानके प्रा.सोनाली अभंग, डॉ.छाया जोशी, प्रा.माधवी चौधरी, प्रा. यशोदा खुळखुळे,प्रा.दिपाली ताम्हाणे, प्रा.दिपाली सोनवणे, कार्यालयीन प्रमुख श्री. प्रवीण भावे, सौ. वर्षा ताजणे, कु. नेहा लांडगे व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता सामुदायिक पसायदानाने झाली असे माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा.माणिक कसाब यांनी दिली.