शबनम न्युज | पुणे
बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आजही अनेकांच्या मनावर राज्य करत आहे. सुशांत ने 14 जून रोजी मुंबईत आत्महत्या केली होती. त्याच्या निधनानंतर चाहत्यांना धक्का लागला होता. सुशांत आजही कित्येकांच्या स्मरणात आहे. सध्या सोशल मीडियावर सुशांत सिंह राजपूत चर्चेत आला आहे. सुशांत सारखा दिसणारा हुबेहूब एका तरुणाने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ व्हायरल केला आहे. या व्हिडिओमध्ये हुबेहूब तो सुशांत सारखा दिसत आहे. डोनीम अयान असे या तरुणाचे नाव आहे.
अयानने त्याच्या इंस्टाग्राम हॅण्डल वर आपले काही व्हिडिओ शेअर केले आहेत. या व्हिडिओज मध्ये तो हुबेहुब सुशांत सारखा दिसत आहे. त्यावरून चाहते अयानची कल्पना सुशांत सोबत करीत आहेत, काही चाहते तर सुशांतच्या पुनर्जन्म विषयी देखील बोलत आहेत. अयान ने इंस्टाग्राम वर मोठ्या प्रमाणात फॉलोवर्स जमा केले आहेत. सुशांतचे अनेक चाहते अयानला इंस्टाग्राम वर फॉलो करत आहेत.
अयानने नुकतेच इंस्टाग्राम ओपन केले आहे. त्यानंतर त्याने आठवड्यापूर्वी पहिला व्हिडिओ शेअर केला होता. त्या व्हिडिओला अनेक लाईक तर अनेक शेअर देखील करण्यात आले. त्यानंतर त्याने अनेक व्हिडिओज शेअर केले आहे. एका व्हिडिओमध्ये सुशांत सिंह राजपूत संबंधित दृश्य, त्याच्या गाण्याची कुशलता, पुनर्रकल्पना देखील अयान ने केली आहे. अयानचे लुक्स देखील सुशांतशी जुळते आहे. इंस्टाग्राम वर @donim.ayaan1513 या अकाउंट वरून अयान आपले व्हिडिओज शेअर करतो. या अकाउंटला आतापर्यंत 11,500 फॉलोवर्स झाले आहेत.
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने 14 जून 2020 रोजी मुंबई बांद्रा येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याच्या निधनानंतर बॉलीवूड मध्ये तसेच देशभरात शोककळा पसरला होता. आजही कित्येक चाहते सुशांतची आठवण करत त्या प्रकारे त्याचे फोटो शेअर करतात. आजही सुशांत प्रत्येक चाहत्यांच्या मनात आहे. सुशांतने अनेक प्रसिद्ध चित्रपट दिले आहेत. केदारनाथ, महेंद्रसिंह धोनी बायोपिक, काय पो छे, छिछोरे, दिल बेचारा या चित्रपटासह सुशांतने अनेक मालिकेत देखील काम केले आहे. छोट्या पडद्यावरील पवित्र रिश्ता ही मालिका अत्यंत गाजली होती. त्यानंतर सुशांत ने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पदार्पणानंतर अनेक प्रसिद्ध चित्रपट देखील त्याने दिले. या अंतर्गत त्यांनी सर्व चाहत्यांच्या मनावर राज्य केले होते. त्याच्या निधनानंतर सर्व चाहत्यांच्या मनावर धक्का बसला होता.