शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरातील सामजिक कार्यकर्ते निखिल उमाकांत दळवी यांनी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षा मध्ये पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला. शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन आहेर यांनी निखिल दळवी यांना शिवबंधन बांधले
या वेळी शिवसेना शहरप्रमुख सचिन भोसले , पुणे उपजिल्हाप्रमुख रोमी भाई, सिंधू निगडी, विभाग प्रमुख सतीश मरळ उपस्थित होते.
निखिल दळवी हे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर मा उपाध्यक्ष होते आकुर्डी परिसरात त्यांचे मोठे समाज कार्य व जनसंपर्क आहे नागरिकांच्या प्रश्न साठी ते नेहमी झटत असतात, करोना काळात त्यांनी दिवंगत नगरसेवक जावेद शेख यांचा बरोबरीने आकुर्डी परिसरातील नागरिकांना चांगली मदत केली होती, दिवंगत नगरसेवक जावेद शेख यांचे निखिल दळवी हे अत्यंत जवळचे कार्यकर्ते होते, निखिल दळवी यांचे चुलते मा सूर्यकांत दळवी हे शिवसेना कडून आकुर्डी तून नगरसेवक राहिले होते त्यांचा समाजसेवेचा वारसा निखिल हे पुढे घेऊन जाता आहेत