शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरात भर रात्री हल्लेखोरांनीं नागरिकांवर हल्ला केला त्यांच्या मदतीला राष्ट्रवादी चे युवा नेते शरद ताम्हाने धावून आले मिळालेल्या माहिती नुसार सोमवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी कोयता हातात घेऊन अक्षरशा चिखली परिसरात तसेच निगडी पासून ते सहयोग नगर, त्रिवेणी नगर, ताम्हणे वस्ती टॉवर लाईन परिसरात तसेच साने चौक या ठिकाणी तीन ते चार जणांचे टोळक्याने कोयत्याचा धाक दाखवून अनेक कामगारांवर हल्ले करत त्यांचे पैसे लुबाडले, मोबाईल व गाड्या हिसकून घेतल्या तसेच एका महिलेच्या हातावर कोयत्याने वार केले
एका कामगाराच्या डोक्याला मार लागले तर अनेक महिला व कामगारांना मारहाण झाली तसेच गाड्यांचे नुकसान झाले व साने चौक येथे एका तरुणाच्या डोक्यात कोयता लागला अनेक महीला व कामगारांना मारहाण झाली गाड्यांचे नुकसान झाले या धक्कादायक घटनेची माहिती या परिसरातील युवा नेते शरद ताम्हणे यांना मिळाली त्यांनी स्वतः रात्री एक वाजता पोलीसांशी संपर्क करुन रात्री कामगारांसोबत चिखली पोलीस स्टेशन येथे जाऊन पोलीस अधिकाऱ्यांना तक्रार दाखल करण्यास तसेच अशा प्रवृत्तींना आळा घालून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली यावेळी घाबरलेल्या नागरिकांना शरद ताम्हणे यांनी धीर दिला .