शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरात भर रात्री हल्लेखोरांनीं नागरिकांवर हल्ला केला सोमवारी रात्री साने-चौक परिसरात येथे चार पाच कामगारावर हा हल्ला करण्यात आला या गंभीर प्रकरणाचा ताबडतोब छडा लावण्यासाठी आणि साने चौक परिसरात रात्रीच्या वेळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यासाठी चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांना या परिसरातील भाजप नेते पांडाभाऊ साने यांनी निवेदन दिले
या निवेदनात मोरेवस्तीमधील रात्रपाळीच्या कामगारांनी अजून किती दिवस भीतीपोटी जगायचं ?? असा सवाल पांडा साने यांनी केला आहे.
सोमवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी कोयता हातात घेऊन अक्षरशा चिखली परिसरात तसेच निगडी पासून ते सहयोग नगर, त्रिवेणी नगर, ताम्हणे वस्ती टॉवर लाईन परिसरात तसेच साने चौक या ठिकाणी तीन ते चार जणांचे टोळक्याने कोयत्याचा धाक दाखवून अनेक कामगारांवर हल्ले करत त्यांचे पैसे लुबाडले, मोबाईल व गाड्या हिसकून घेतल्या तसेच एका महिलेच्या हातावर कोयत्याने वार केले.
एका कामगाराच्या डोक्याला मार लागले तर अनेक महिला व कामगारांना मारहाण झाली तसेच गाड्यांचे नुकसान झाले व साने चौक येथे एका तरुणाच्या डोक्यात कोयता लागला अनेक महीला व कामगारांना मारहाण झाली गाड्यांचे नुकसान झाले या संदर्भात निवेदन देताना पांडा साने यांनी नमूद केले आहे कि मोरेवस्ती परिसरात असंख्य नोकरदार व कामगारवर्ग वास्त्यव्यास आहे. रात्री अपरात्री भयावह अवस्थेत कामावरून घरी यावे लागते. काल रात्री सानेचौक परिसरात अशाच काही लुटारू गुंडानी काही कामगारांवर कोयत्याने वार केले व त्यांना गंभीर जखमी केले. त्या कामगारांचे पैसे, मोबाईल, व इतर साहित्य हिसकावून तेथून पळून गेले.अतिशय विकृत प्रवूतिच्या लुटारू गुंडानी कोयत्याचा धाक दाखवून मोरेवस्ती परिसरात दहशत माजवली आहे.परिसरातील नागरिकांनमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.तसेच रात्री घडलेल्या या गंभीर प्रकरणाचा ताबडतोब छडा लावण्यासाठी आणि साने चौक परिसरात रात्रीच्या वेळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यासाठी चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना पांडा साने यांच्या वतीने निवेदन देण्यात आले .