- इंद्रायणी महिला प्रतिष्ठान व भाजपा युवा मोर्चा चा सालादाबादा प्रमाणे उपक्रम
- निलम शिवराज लांडगे व शिवराज लांडगे यांचा पुढाकार
शबनम न्युज | पिंपरी
संकटाच्या काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून पोलीस बांधव हे कर्तव्य बजावत असतात. आपल्या परिवारा पासून दूर आपली ड्युटी करण्यासाठी कर्तव्य पार पाडत असलेल्या भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथील पोलिस अधिकारी, पोलिस कर्मचारी, पोलीस बांधव यांना इंद्रायणी महिला प्रतिष्ठानचे अध्यक्षा सौ निलम ताई शिवराज लांडगे व भारतीय जनता युवा मोर्चा पिंपरी चिंचवड यांच्या वतीने राखी बांधून हा रक्षाबंधनचा सण साजरा केला. त्यावेळी युवा मोर्चाच्या पुजाताई अल्हाट, मुक्ताताई गोसावी, नंदिनीताई गावडे, पांचाळ ताई व इतर भगिनी उपस्थित होते.
Advertisement