शबनम न्यूज , प्रतिनिधी :
आज आपल्या भारत देशाचा स्वतंत्र दिवस मोठ्या उत्साहात संपूर्ण देशात साजरा करण्यात आला . झेंडावंदना सहित विविध सामाजिक उपक्रम आपल्या स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने राबविण्यात आले यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते माजी वृक्ष प्राधिकरण सदस्य संभाजी बारणे यांच्या वतीने थेरगाव परिसरात या स्वतंत्र दिनानिमित्ताने झेंडावंदनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. स्वतंत्र दिनाचे औचित्य साधत संभाजी बारणे यांनी मोठ्या प्रमाणात वृक्ष दान केले या वृक्षदानमध्ये, विविध प्रकारचे झाडांची रोपे नागरिकांना देण्यात आली.
पर्यावरण पूरक वातावरण निर्माण व्हावे तसेच आपल्या येणाऱ्या पिढीला ऑक्सिजनची कमतरता भासू नये वृक्षसंख्या आपल्या परिसरात , शहरात वाढावी यासाठी संभाजी बारणे यांनी हा एक स्तुत्य उपक्रम राबविला.
थेरगाव परिसरातील माजी नगरसेविका मनीषा पवार यांच्या हस्ते झेंडावंदनाचा कार्यक्रम संपन्न झाला तसेच त्यांच्या हस्ते वृक्ष दान करण्यात आले , झाडांची रोपे नागरिकांना वाटप करण्यात आली यावेळी माजी स्वीकृत सदस्य संदीप गाडे, माजी नगरसेविका उषा चोरडिया, सामाजिक कार्यकर्ते तानाजी बारणे यांचे सह थेरगाव परिसरातील अनेक मान्यवर नागरिक, महिला ,पुरुष, युवक ,युवती यांनी मोठ्या संख्येने सदर कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली या सर्व नागरिकांना वृक्ष रोपटे दान करण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी संभाजी बारणे यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले तसेच वृक्षारोपणाचे महत्त्व समजावून सांगितले भविष्यकाळात आपल्या येणाऱ्या पिढीला शुद्ध हवा व ऑक्सिजन ची कमतरता भासू नये याकरिता आपण सर्वांनी वृक्षरोपण करायला हवे तसेच पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी वृक्षारोपण काळाची गरज असल्याचे यावेळी संभाजी बारणे यांनी सांगितले.