स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून देहूरोड पोलिसांनी शोधलेले मोबाईल दिले
शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील देहू रोड परिसरात मोबाईल चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. तसेच वर्दळीचा भाग असल्याने मोबाईल हरवल्याच्या तक्रारी देखील देहूरोड पोलीस ठाण्यात दाखल होतात. बऱ्याचदा मोबाईल चोरी झाल्यानंतर संबंधित व्यक्तीला कळत नाही. ते देहू रोड पोलीस ठाण्यात मोबाईल गहाळ झाल्याची किंवा हरवल्याची तक्रार देतात. अशा नऊ मूळ मालकांना त्यांचा हरवलेला मोबाईल देहूरोड पोलिसांनी परत दिले आहेत. ही कामगिरी सहाय्यक पोलीस आयुक्त पद्माकर घनवट, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांच्यासह तर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी केली आहे.
हरवलेले मोबाईल मूळ मालकांना परत केल्याची कामगिरी देहूरोड पोलिसांनी केली आहे. देहूरोड पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये काही नागरिकांचे मोबाईल हरवले होते. त्याची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला, तपासांती हरवलेले नऊ मोबाईल पोलिसांना सापडले. ते १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मूळ मालकाला परत दिले.