शाळा बंद असताना विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी असणाऱ्या ‘वॉटर फिल्टर’ खरेदी करू नये – नाना काटे
शबनम न्यूज / पिंपरी
कोरोना महामारीमुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मागील एक वर्षापेक्षा जास्त काळ शाळा बंद आहेत. असे असताना महिला व बाल कल्याण समितीने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी या गोंडस नावाखाली ‘वॉटर फिल्टर’ खरेदीचा घाट घातला आहे. शाळा बंद असताना विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी असणाऱ्या ‘वॉटर फिल्टर’ खरेदी करू नये अशी मागणी माजी विरोधी पक्ष नेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी केली आहे. यातील ठेकेदाराला पोसण्याचे काम महापालिका प्रशासनाने करू नये. असे हि नाना काटे यांनी म्हंटले आहे.
नाना काटे यांनी दिलेल्या पत्रात म्हंटले आहे कि कोरोनामुळे शहरात दिवसाला शेकडो रुग्णांचा मृत्यू होत असताना आरोग्य यंत्रणेने वरती पैसे खर्च करावेत. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार टक्केवारीसाठी सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी चक्क अतिरिक्त आयुक्तांवर (1) दबाव आणत असल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार पालिकेच्या नावाला काळीमा फासणारा आहे.
राज्य सरकारने गेल्या एक वर्षापासून शहरातील सर्व शाळा बंद ठेवल्या आहेत. विद्यार्थी घरी राहून ऑनलाईन अभ्यासक्रम पूर्ण करत आहेत. मुले शाळेत नसताना विद्यार्थ्यांना शुध्द पाणी पिण्यासाठी वॉटर फिल्टर बसविण्याचा घाट घातला म्हणजे पालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारला जात असल्याचे उघडउघड दिसून येत आहे. शहरात मृत्युचे तांडव डोळ्याने पाहवत नाही. ऑक्सिजनची कमतरता, रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्धता. लसीकरण यंत्रणेची नियोजन याला प्रशासनाने सहकार्य करावे. मागील वर्षी कोरोना महामारीमुळे महापालिकेचा कर संकलन कमी झाले आहे. एकीकडे आर्थिक संकट असताना व शाळेत मुले नसताना महापालिका प्रशासनाने सत्ताधारी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मागणीला बळी न पडता सामान्य पिंपरी-चिंचवडकरांचा पैशाचा विनियोग विचारपूर्वक करावा, असे हि नाना काटे यांनी सांगितले आहे