निगडी : निगडी, यमुना नगर, साईनाथ नगर, ओटा स्कीम, ञिवेणी नगर या भागात मोकाट जनावरांना लम्पी आजाराची लागण झाली आहे. आता ही जनावरे परीसरात मोकाट फिरत आहे. या जनावराच्या संदर्भात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रसाद गणपत कोलते यांनी पशुवैद्यकीय विभागाला वारंवार पत्रव्यवहार करून देखील प्रशासनाने या मोकाट जनावरच्या संदर्भात काना डोळा केला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने या जनावरांचे लवकर लसीकरण करणे गरजेचे आहे. नाहीतर या आजाराची इतर जनावरांनाही लागण होण्याची दाट शक्यता आहे.