शबनम न्युज | चिंचवड
चिंचवड गावातील मोरया गोसावी मंदिर जवळ दशक्रिया विधी घाटावरील विद्युत खांबावरील हॅलोजन लाईट जवळपास एक वर्षापासून बंद आहे. त्यामुळे तेथील स्वच्छता करण्यासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो, यासाठी सदर जागेवरील हॅलोजन लाईट बसविण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र महावितरण समितीचे सदस्य मधुकर बच्चे यांनी पिंपरी चिंचवड व प्रभागाच्या विद्युत विभाग अभियंता दमयंती पवार यांना निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, चिंचवड गावातील मोरया गोसावी मंदिर जवळ दशक्रिया विधी घाट आहे या घाटावर रोज दशक्रिया विधी होत असतात या घाटावरील विद्युत खांबावरील हॅलोजन लाईट जवळपास 1 वर्ष झाले बंद आहे 1 वर्षापूर्वी दुरुस्थ करण्यास नेली तर आजून बसविली नाही. या घाटावरील स्वच्छता करण्यासाठी पालिकेचे कर्मचारी लवकर येत असतात त्यांना अनेक वेळा अंधारातच स्वछता करावी लागते, त्यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो
तसेच दशक्रिया विधी साठी अनेक वेळा लाईटची आवश्यकता भासते. नागरीकांनी वेळोवेळी प्रशासणास
माहिती देऊनही हे दशक्रिया घाटावर विद्युत योग्य प्रकारे नसणे हे अत्यन्त चुकीचे आहे एवढ्या दिवस ही टाळा टाळ का झाली याची चौकशी करून समंधीतास जाब विचारला पाहिजे