सौ.प्रतिमा काळे यांचा ” मी प्रतिमा माझी प्रतिमा” हा काव्यसंग्रह सप्रेम भेट
शबनम न्युज | प्रतिनिधी
आकुर्डी येथील “नवनगर शिक्षण मंडळाच्या सरस्वती माध्य. व उच्च माध्य. विद्यालयतील इयत्ता ५ वी ते १० वी च्या गाईड पथकाच्या वतीने रक्षाबंधनचे औचित्य साधून निगडी पोलिस ठाणे येथील बंधू भगिनींना राखी बांधण्याच्या कार्यक्रमाचे नवनगर शिक्षण मंडळाचे संस्थापक मा. प्रा.श्री. गोविंदराव दाभाडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आलेले होते.
या प्रसंगी निगडी पोलिस ठाणे मधील सर्व बंधू व भगिनी तसेच सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे गाईडर सौ.प्रतिमा काळे,सौ.जयश्री घावटे,सौ.देवरे मॅडम उपस्थित होते.या प्रसंगी मा.उज्ज्वला पाटील मॅडम यांना सौ.प्रतिमा काळे यांचा ” मी प्रतिमा माझी प्रतिमा” हा काव्यसंग्रह सप्रेम भेट देण्यात आला.मुलींना पोलिस ठाण्यातून खाऊ वाटप करण्यात आला.