शबनम न्युज | प्रतिनिधी
भोसरी – भाजपा महिला मोर्चाच्या वतीने भोसरी एसटी डेपोतील कर्मचाऱ्यांना राखी बांधत रक्षाबंधन सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
रक्षाबंधन हा सण बहिण भावाच्या अतुट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे या दिवसाचे औचित्य साधून आमदार महेश दादा लांडगे यांच्या प्रेरणेने भाजपा महिला मोर्चा सरचिटणीस सौ. कविता भोंगाळे यांच्या पुढाकाराने पार पडले. यावेळी बोलताना सौ. कविता भोंगाळे म्हणाल्या की एसटी कर्मचारी सर्वसामान्य लोकांची सेवा करताना सणासुदीच्या काळात देखील आपल्या कुटुंबापासून दूर राहत आपले कर्तव्य बजावत असतात. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या सामाजिक भावनेतून अशा कर्मचाऱ्यांना राखी बांधण्याचा उपक्रम आम्ही भाजपा पिंपरी चिंचवड महिला मोर्चाच्या वतीने यावर्षी साजरा करत आहोत.
भोसरी एसटी डेपोमध्ये मोठ्या उत्साहात असे अनोखे रक्षाबंधन पार पडले. याप्रसंगी भोसरी आगार प्रमुख, श्री. विजयकुमार मदने, भाजपा प्रभाग क्रमांक ५ अध्यक्षा सौ.स्वाती शिर्के, उपाध्यक्षा मनिषा गंगणे, प्रभाग सरचिटणीस सौ. दिपाली मोरे, सुमन घोलप, आदीसह भाजपा महिला कार्यकर्त्या व एसटी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.