शबनम न्युज | डेहराडून
भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू ऋषभ पंतच्या कारला दिल्लीहून घरी परतत असताना मोठा अपघात झाला आहे, हम्मादपूर झालजवळ रुरकीच्या नरसन सीमेवर त्याच्या कारला अपघात झाला. ऋषभला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणण्यात आले आहे. तिथे त्याची प्लास्टिक सर्जरी केली जाणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभची कार रेलिंगला धडकली, त्यानंतर कारने पेट घेतला. मोठ्या कष्टाने आग आटोक्यात आणण्यात आली. त्याचवेळी अपघातात गंभीर जखमी झालेल्या ऋषभ पंतला दिल्ली रोडवरील सक्षम रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची कार नरसन शहराजवळ आल्यावर गाडीचे नियंत्रण सुटले आणि रेलिंग आणि खांब तोडून कार उलटली.
यानंतर त्याच्या कारला आग लागली. तोपर्यंत गावकरी आणि पोलीसही घटनास्थळी पोहोचले. याची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली. अग्निशमन दलाच्या गाडीने घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. घाईगडबडीत क्रिकेटपटू ऋषभ पंतला दिल्ली रोडवरील सक्षम रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथून त्याला डेहराडूनला रेफर करण्यात आले आहे.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषभ पंतच्या कपाळावर आणि पायाला पाठीला मोठी दुखापत झाली आहे. माहिती मिळताच देहात पोलीस अधीक्षक स्वप्ना किशोर सिंह घटनास्थळी पोहोचल्या. सक्षम हॉस्पिटलचे अध्यक्ष डॉ. सुशील नागर यांनी सांगितले की, सध्या ऋषभ पंतची प्रकृती स्थिर आहे, त्याला रुरकीहून डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. तिथे त्याची प्लास्टिक सर्जरी केली जाणार आहे.