शबनम न्युज | प्रतिनिधी
आकुर्डी पुणे येथील श्री सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर या शाळेतील शिक्षिका सौ. शितल भानुदास औटी यांना शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल ग्लोबल स्काॅलर फाऊंडेशन पुणे यांचेकडून डायमंड ऑफ इंडिया या पुरस्काराने मा.श्री.गिरीश प्रभुणे पद्मश्री यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार सोहळा वाकड पुणे येथील सयाजी हाँटेल मध्ये संपन्न झाला पुरस्कार सन्मान सोहळ्यात शाळेचे संस्थापक अध्यक्ष श्री. दाभाडे सर व मुख्याध्यापक श्री. माळे सर यांचे खूप मोलाचे सहकार्य लाभले.
Advertisement