महाराष्ट्र गोसेवा आयोगाला शासनाच्यावतीने आवश्यक सहकार्य करू – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या कार्यालयाचे पुण्यात उद्घाटन
शबनम न्युज | प्रतिनिधी
पुणे दि.२: राज्यामध्ये गाईंचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी विविध गोशाळा समर्पित भावनेने काम करीत असून या कार्यासाठी शासनाच्यावतीने आवश्यक ती मदत केली जाईल, यासाठी महाराष्ट्र गोसेवा आयोगाला लागणारा निधी व मनुष्यबळ कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील दिली.
पशुसंवर्धन आयुक्तालय,औंध येथे महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या कार्यालय उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, पशुसंवर्धन आयुक्त हेमंत वसेकर, सहआयुक्त शितलकुमार मुकणे, आयोगाचे सदस्य सुनील सूर्यवंशी, संजय भोसले, डॉ. नितीन मार्कंडेय आणि उद्धव नेरकर उपस्थित होते.
जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर काल पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडली.या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटण्यास सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज जालना येथील आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन विचारपूस केली.तर त्यावेळी शरद पवार यांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधताना भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली.शरद पवार यांच्या या भूमिकेनंतर भाजपच्या अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहे.
त्याच दरम्यान भाजपचे नेते मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे पुणे दौर्यावर होते.त्यावेळी शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.हा प्रश्न राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारताच ते म्हणाले की,भाजपचे नेते उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागण्याचा नैतिक अधिकार शरद पवार यांना नाही.भाजप सरकारच्या काळात मराठा आरक्षण टिकविण्याच काम देवेंद्र फडणवीस यांनी केले.पण शरद पवार यांनी मराठा आरक्षणासाठी एक तरी प्रयत्न केला का ? हे स्वतः शरद पवार यांनी सांगावे.कायम आरक्षणा विरोधात त्यांनी भूमिका मांडली आहे.ही बाब सर्वांनी माहिती आहे.तुम्ही देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागण्या ऐवजी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते.त्यावेळी त्यांनी मराठा आरक्षण घालवले. तेव्हा उद्धव ठाकरे यांचा राजीनामा का मागितला नाही. अशा शब्दात शरद पवार यांच्यावर त्यांनी निशाणा साधला.