शबनम न्यूज | प्रतिनिधी :
सांगवी : लायन्स इंटरनॅशनल 3234 डी 2 च्या रिझन फोर व फाईव्ह च्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कस्पटे वस्ती शाळेच्या पदवीधर शिक्षिका सौ. सविता शिवाजीराव माने यांना बेस्ट टीचर पुरस्कार देऊन लायन्स इंटरनॅशनल 3234 डी 2 चे प्रांतपाल एम जे एफ ला. विजयजी भंडारी, शिक्षणतज्ञ डॉ . अ.ल.देशमुख ,रिजन चेअर पर्सन एम.जे.एफ.ला.धनराज मंघनानी यांच्या हस्ते गौरवण्यात आले.प्रतिभा इंटर नॅशनल स्कूल च्या हॉलमध्ये पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
शिक्षक दिनाच्या दिवशी पिंपरी चिंचवड व पुणे परिसरातील एकूण 30 शिक्षकांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. सविता माने यांचे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक काम उत्कृष्ट असल्याने लायन क्लब इंटरनॅशनल कडून पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. जिल्हा प्रांतपाल एम जे एफ ला. विजय भंडारी यांनी पुरस्कार विषयी बोलताना सविता माने यांना भविष्यातील शैक्षणिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी सौ.माने म्हणल्या ह्या पुरस्कार मिळण्या मागे माझ्या कुटुंबाचे म्हणजे माझे पती आदर्श मुख्याध्यापक शिवाजीराव माने,माझी मुलगी डॉ प्रतिक्षा माने, मुलगा अथर्व माने यांचे फार मोठे सहकार्य आहे.त्यांच्यामुळे मी हे सामजिक व शैक्षणीक काम करू शकले.या पुरस्कार वितरण कार्यक्रमा वेळी लायन्स क्लब ऑफ पुणे रहाटणीचे अध्यक्ष ला. अमोल दापुरकर, सचिव हेमंत रसाळ, संस्थापक वसंतभाऊ कोकणे, , ला.प्रमोद भोंडे, प्रशांत गोमकाळे, समीर अग्रवाल ,विक्रमसिंह शक्तावत, अभिषेक मोहिते, ला.धीरज कदम,प्रशांत तेलंग ,अविनाश बारणे जॉनी थदानी आणि सर्व रीजन फोर व फाईव्ह मधील लायन्स पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. सर्व थरातून सौ माने यांचे पुरस्कारा बद्दल कौतुक होत आहे