शबनम न्युज | मुंबई
“सभा घेताना तुम्ही जर माझ्यासोबत काम करत असलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश पक्षात करून आमचेच कार्यकर्ते फोडत असले, तर मलाही नाईलाजाने तशी पावले उचलावी लागतील, असा इशारा आमदार योगेश कदम यांनी भाजप पक्षाला दिला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या घोषणेला काहीच दिवस शिल्लक आहेत. अशावेळी भाजपा शिवसेनेमधला वाद चव्हाट्यावर आला आहे. भाजपाने आमचा केसाने गळा कापू नये, असे विधान करत रामदास कदम यांनी भाजपावर आग पाखर केली होती. त्यानंतर आता त्यांचे पुत्र आमदार योगेश कदमही भाजपा व संतापले आहेत.
ते म्हणाले, प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा आणि काम करण्याचा अधिकार आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी इथे येऊन सभा घेतली. त्याचे मला काही वाईट वाटण्याचा कारण नाही. कारण त्यांना पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. परंतु सभा घेताना तिथे काही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे प्रवेश करून घेतले. जे माझ्यासोबत काम करत होते, तर अशा गोष्टी व्हायला नको. जेव्हा आपण एकत्र मिळून काम करतोय, महायुतीत समन्वय ठेवून पुढे जातोय, अशावेळी जर आमचेच कार्यकर्ते फोडत असेल तर मलाही नाईलाजाने तशी पावले उचलावी लागतील, असा इशारा योगेश कदम यांनी भाजपाला दिला आहे.