पिंपरी-चिंचवड शहरातील किवळे – रावेत या परिसरातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने तसेच या परिसरातील साई नगर .मामुर्डी. विकास नगर. बापदेव नगर. दत्त नगर .आदर्श नगर या भागात वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे येथील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता तसेच लॉक डाउन काळात नागरिकांना घरी बसून काम करावे लागत असल्याने त्यांना त्यांच्या कामात अडचणी निर्माण होत होत्या वेळेवर काम होत नव्हते या सर्व परिस्थिती ची माहिती या भागातील माजी नगरसेवक मनोज खानोलकर यांना मिळाली त्यांनी आपले सहकारी राष्ट्रवादीचे कार्यकर्त्या अर्चना राऊत ,पूजा मुर्गेश ,अभिषेक लोंढे ,सचिन काळे ,फारूक मुलांनी यांच्या समवेत या संदर्भात या भागातील विद्युत पुरवठा अधिकारी यांची भेट घेतली व समस्या मांडली व या समस्येचे लवकरात लवकर निराकरण करावे असे निवेदनही दिले.
विद्युत अधिकाऱ्यांनीही तीन ते चार दिवसांच्या मुदतीत समस्येचे निवारण होईल असे आश्वासन दिले या वेळी माजी नगरसेवक मनोज खानोलकर यांनीही जर या काळामध्ये समस्येचे निवारण झाले नाहीतर महावितरण कार्यालयावर मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला