शबनम न्यूज | पिंपरी
महाराष्ट्र राज्य लगोरी निवड चाचणी स्पर्धेमध्ये निवड होऊन पिंपळे निलख मधील राजू गोसावी सर यांच्या मार्गदर्शनाखाली शर्वरी कामठे, प्रणिता सरोदे, तपस्वी नागून, वैष्णवी कांबळे नम्रता वाघ यांनी हरियाणा येथे असलेल्या राष्ट्रीय खेळात (नॅशनल गेम) मध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल समस्थ पिंपळे निलख गावाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
या वेळी विशालनगर पिंपळे निलखच्या मा. नगरसेविका आरतीताई चोंधे, भारतीय जनता युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंधे, माजी सैनिक भगवानराव खैरे, सुदामराव इंगवले, प्रकाशशेठ कामठे , संतोष दळवी, पांडुरंग इंगवले, जितीन इंगवले, भूषण इंगवले, दिलीपबापु इंगवले, पवन कामठे, माणिक भांडे, अश्विनी हरेल, गर्जे सर व समस्थ पिंपळे निलख रहिवाशी उपस्थित होते.
Advertisement