पिंपरी, दि. १४ सप्टेंबर २०२३:- पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि ज्यूनिअर इंजिनिअर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार १५ सप्टेंबर रोजी भारतरत्न मोक्षगुंडम् विश्वश्वरैया यांची जयंती तसेच राष्ट्रीय अभियंता दिनाच्या निमित्ताने चिंचवड येथील प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून प्रख्यात उद्योजक, वक्ते तसेच लेखक शरद तांदळे उपस्थित राहणार आहेत.
Advertisement