शबनम न्यूज | प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड शहरातील तालेरा हॉस्पिटल मध्ये आयुष्यमान भव या कार्यक्रमाचे उद्घाटन नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांच्या हस्ते करण्यात आले . या वेळी सुरेश भोईर यांनी प्रभाग क्रमांक १८ मधील सर्व नागरिकांना आवाहन केले , केंद्र शासनाच्या अंतर्गत आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आयुष्यमान भारत स्वास्थ कार्ड (आभा कार्ड ) तालेरा हॉस्पिटल मध्ये जाऊन काढून घेण्यात यावे व सर्व नागरिकांनी या आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा. असे आवाहन केले
यावेळी डॉक्टर नंदकुमार मोरे सर, डॉक्टर पूजा मॅडम, रविंद्र प्रभूणे, व सर्व आरोग्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते,
Advertisement