शबनम न्यूज | औंध
पुण्यातील रयत शिक्षण संस्थेचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 136 व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत आज 20 सप्टेंबर 2023 रोजी VALUE EDUCATION आणि IQAC यांच्या संयुक्त विद्यमाने “कर्मवीर भाऊराव पाटील जीवन चरित्र – अभिवाचन कार्यक्रम संपन्न झाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण आंधळे होते. तसेच सदर कार्यक्रमाच्या समन्वयक प्रा. सायली गोसावी होत्या. कर्मवीर भाऊराव पाटील जीवन चरित्र अभिवाचन प्रा. डॉ.सविता पाटील, प्रा. रेश्मा दिवेकर,
प्रा. देवकी राठोड, प्रा. सायली गोसावी तसेच महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी कु. अवनी चव्हाण, कु. साक्षी खवळे यांनी केले.
यावेळी बोलताना प्राचार्य अरुण आंधळे यांनी सदर कार्यक्रमाचे तसेच आयोजकांचे कौतुक केले. पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवन चरित्राचे अभिवाचन करणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांना पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्याची माहिती असावी तसेच कर्मवीर भाऊराव पाटील यांचे जीवन चरित्र सर्वांना माहिती असावे, यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी मराठी विभाग प्रमुख प्रा. प्रभंजन चव्हाण, प्रा. राजेंद्र रासकर, प्रा. रमेश रणदिवे, प्रा. कल्याणी सोनावणे, प्रा. गुजर सर, प्रा. स्वाती चव्हाण, महाविद्यालयाचे विद्यार्थी आदी उपस्थित होते.
महाविद्यालयात 20 सप्टेंबर 2023 ते 25 सप्टेंबर 2023 पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ते खालील प्रमाणे –
- गुरुवार (दि. 21 सप्टेंबर) – निबंध लेखन स्पर्धा, चित्रकला स्पर्धा.
- शुक्रवार (22 सप्टेंबर) – कर्मवीर चित्ररथ मिरवणूक.
- शनिवार (दि. 23 सप्टेंबर) – वकृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा.
- रविवार (दि. 24 सप्टेंबर) – रांगोळी स्पर्धा.
- सोमवार (दि. 25 सप्टेंबर) – पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती समारंभ सप्ताह संपन्न.