शबनम न्युज | प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 13 मधील कुटुंबांना सुरळीत पाणीपुरवठा व्हावा तसेच या प्रभागातील ड्रेनेज लाईन दुरुस्त करण्याबाबतची मागणी मनपा आयुक्त यांच्याकडे श्री अजित दादा पवार सोशल फाउंडेशन वतीने करण्यात आली आहे.
फाउंडेशनचे संस्थापक उपाध्यक्ष महेश अरुण यांनी दिलेले निवेदनात नमूद केले आहे की शहरातील प्रभाग क्रमांक 13 या परिसरात मध्यमवर्गीय ते सामान्य कुटुंब वास्तवास असून हे सर्व कुटुंबातील सदस्य मोलमजुरी करून आपली उपजीविका भागवत असतात या परिसरात पाणीपुरवठा सुरळीत होत नाही त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो तसेच या भागात ड्रेनेज चेंबर पावसाच्या पाण्याने भरले जाते त्यामुळे आरोग्यालाही धोका निर्माण होतो या सर्व परिस्थिती कडे लक्ष देत महानगरपालिका प्रशासनाने या परिसरात सुरळीत पाणीपुरवठा करावा तसेच येथील रस्ते सफाई व ड्रेनेज लाईनची सफाई व दुरुस्ती करावी अशी मागणी अजित दादा पवार सोशल फाउंडेशन वतीने करण्यात येत असल्याचे नमूद केले आहे.