शबनम न्यूज , प्रतिनिधी :
देहू : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील कोटेश्वरवाडी, शेलारवाडी,झेंडेमळा, काळोखे मळा,किन्हई,चिंचोली, सिद्धिविनायक नगरी येथील सुमारे १२ कोटींच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला.
आमदार सुनील शेळके यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले कि कॅन्टोन्मेंट हद्दीतील नागरिकांच्या मागणीनुसार सार्वजनिक कामांना प्राधान्य दिले आहे.येथील नागरिकांसाठी मुलभुत सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे.सुमारे बारा कोटी तीस लक्ष निधीतून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरण व डांबरीकरण करणे,सार्वजनिक स्वच्छतागृह बांधणे, बंदिस्त गटार करणे, सभामंडप बांधणे, विरंगुळा केंद्र बांधणे, शाळेच्या वर्ग खोल्या बांधणे, वस्तीतील शौचालय बांधणे,दफनभूमी व समाज मंदिराला संरक्षक भिंत बांधणे,स्ट्रीट लाईट बसविणे इ.कामे होणार आहेत.
या भूमिपूजन समारंभ प्रसंगी माजी नगरसेवक, आजी-माजी पदाधिकारी,महिला , नागरिक , युवा व स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.