शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरात मागील 24 तासांत सर्वाधिक 55 मिलिमीटर पाऊस झाला आहे. शहरात मंगळवारी रात्रीपासून जोरदार पाऊस पडत आहे. रात्रभर पावसाची संततधार सुरू होती. रविवार आणि सोमवार दोन दिवस पावसाने विश्रांती घेतली, मंगळवारी सकाळ पासून ढगाळ वातावरण होते. दुपारी थोड्या सरी कोसळल्या, सायंकाळी 7 पासून जोरदार पावसाला सुरुवात झाली.
तसेच बुधवारी देखील सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. मागील 24 तासात चिंचवड मध्ये सर्वाधिक 55 मिलिमीटर पाऊस पडला आहे. त्या खालोखाल तळेगाव मध्ये 50.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
Advertisement
दरम्यान, पवना धरण 100% भरल्याने रात्रीपासून धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. 1400 क्यूसेन्सने नदीत पाणी सोडण्यात येत आहे.