शबनम न्युज | मंचर
गोवा राज्यात निर्मित विदेशी वाद्याचा साठा करून विक्रीसाठी जवळ बाळगणाऱ्या व्यक्तीवर राज्य उत्पादन शुल्क नारायणगाव विभागाने धडक कारवाई केली असून, विदेशी दारू, चार चाकी वाहन, मोबाईल असा एकूण 10 लाख 4 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी सतीश नानाभाऊ रणपिसे (वय 39, रा. पोंदेवाडी, ता. आंबेगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. नारायणगाव विभाग कार्यालयास पोंदेवाडी गावाच्या हद्दीत एक व्यक्ती अवैध मध्याची वाहतूक करणार असल्याची खात्री नायक माहिती मिळाली होती. उत्पादन शुल्क विभागाचे अधिकाऱ्यांनी मागील चार-पाच दिवसापासून रात्रीची गस्त घेऊन खबरींचे जाळे बनवून नियोजित जागेवर सापळा रचण्यात आला. पोंदेवाडी पारगाव रस्त्यावर चार चाकी वाहनांचा क्रमांक एम एच 14 के डब्ल्यू 84 10 संशय आल्याने व त्यात पांढऱ्या रंगाच्या गोण्या भरलेल्या दिसून आल्याने वाहनाची तपासणी केली, वाहनात गोवा राज्यनिर्मित आणि राज्यात विक्रीकरिता प्रतिबंधित असलेले विदेशी मध्य मिळून आले.