शबनम न्युज | पुणे
प्रवाशांच्या सोयीसाठी पुणे, लोणावळा दरम्यानच्या रेल्वे स्टेशनवर घेण्यात येणार अनेक निर्णय व अनेक पुढील काळात होणारे बदल सर्वात महत्त्वाचे म्हणजे चिंचवड येथील नवीन पदचारी पूल पुढील दोन-तीन महिन्यातच प्रवाशांसाठी चालू करणार, इलेक्ट्रॉनिक लावण्यात येणार, सीसीटीव्ही कॅमेरे प्रत्येक स्टेशन वर लावण्यात येणार आहे. सुरक्षेमध्ये वाढ करण्यात येणार असून, गुरुवारी दुपारी डीआरएम कार्यालयात डीआर युसी विभागीय रेल्वे सल्लागार समिती सदस्य ची रेल्वे अधिकाऱ्यांशी बैठक झाली. या बैठकीमध्ये विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा यांनी माहिती दिली.
चौपदरी करण्याचे काम निधीअभावी रखडले आहे. रेल्वेला गती देण्यास खासदार, आमदारांकडून पाठपुरावा करणे गरजेचे असून, पॅसेंजर गाड्या व पास सुरु करण्यासाठी राज्य शासनाची परवानगी आवश्यक आहे.असे काही रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले व काही मागण्याही करण्यात आल्या आहेत. महिलांबाबत होत असणाऱ्या गैरप्रकार, महिला सुरक्षा संदर्भ तसेच रेल्वे अपघातात वाढ या दृष्टिकोनातून आरपीएस मनुष्यबळ वाढवून यंत्रसामग्री कमी पडत असून ती देण्यात यावी, रेल्वेस्थानकावर रात्रीच्या वेळेस आर पी एस पोलीस पेट्रोलिंग करण्यात यावी, दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना लोकलचे तिकीट देण्यात यावे, पुणे पिंपरी-चिंचवड, देहू रोड, तळेगाव, भारताच्या विविध राज्याचे व्यवसायिक आहेत. लोकसंख्येचा विचार करून चिंचवडला काही लांब पल्याच्या गाड्यांना थांबे देण्यात यावेत. सध्या पिंपरी-चिंचवड शहरात बऱ्यापैकी विकास होत आहे. औद्योगिक क्षेत्र आहेत. तसेच पॅसेंजर रेल्वे सुरू कराव्यात, असे यावेळी उपस्थित असलेले अनेक सदस्य तसेच बशीर सुतार, निखिल काची, शिवनाथ बीयानी, दीपाली ताई धानोकर या सदस्यांनी अन्य मागण्या केल्या. यावेळी व्यवस्थापक डॉ.स्वप्नील नील आदींसह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.