शबनम न्युज | प्रतिनिधी
आळंदी । प्रतिनिधी
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय, डुडूळगाव, जि. पुणे. या ठिकाणी पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती व शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २२/०९/२०२३ ते २३/०९/२०२३ या दरम्यान आंतर महाविद्यालयीन “क्रॉस कंट्री” क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. क्रीडा स्पर्धेच्या पहिल्या दिवशी क्रीडा स्पर्धाकांची नोंदणी व शारीरिक शिक्षण संचालकाची सभा घेण्यात आली. दुसऱ्या दिवशी सकाळी ७.०० वाजता “क्रॉस कंट्री” स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेचे उदघाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात यांनी क्रीडासंचालक, सहभागी खेळाडू, सर्व सहाय्यक प्राध्यापक व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत केले. ३५ महाविद्यालयाच्या १२७ खेळाडूनी सहभाग नोंदवला तर मुलींच्या स्पर्धेत १८ महाविद्यालय च्या ६५ खेळाडूंनी सहभाग नोंदवला.
मुलांच्या स्पर्धेत क्रीडा स्पर्धा समाप्तीनंतर बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत पुरुष गटात विजेता संघ, अण्णासाहेब आवटे महाविद्यालय, मंचर, उपविजेता संघ, वाघीरे महाविद्यालय, सासवड, द्वितीय उपविजेता संघ, श्री शिवछत्रपती महाविद्यालय, जुन्नर, आणि महिला गटात विजेता संघ, वाघीरे महाविद्यालय, सासवड., उपविजेता संघ, अण्णासाहेब आवटे महाविद्यालय, मंचर, द्वितीय उपविजेता संघ, बाळासाहेब जाधव महाविद्यालय, आळे. इत्यादी संघ यशस्वी ठरले.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रा. दिनेश गुंड आंतराष्ट्रीय कुस्ती पंच यांनी खेळाडूंनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतांना क्रीडा क्षेत्राशी जवळीकता साधली पाहिजे कारण क्रीडाक्षेत्र आपले जीवन घडविण्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण असून विद्यार्थ्यांनी जिज्ञासा व महत्वकांक्षा जोपासली पाहिजे. विद्यार्थी जीवनात नकारात्मक भूमिकेपेक्षा सकारात्मक भूमिका आयुष्याला कसे वेगळे वळण देते या संदर्भात विविध उदाहरणाचे दाखले देत खेळावर प्रेम केले तर आरोग्यावर निश्चितच मात करता येते असे मत व्यक्त करून क्रीडा क्षेत्रात पदार्पण केलेल्या सर्व मुली व मुलांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात यांनी “Sound Mind Sound Body ” या म्हणीचा विद्यार्थी जीवनात कसा फायदा आहे या संदर्भात मत व्यक्त करून मन, मेंदू व मनगट बळकट असेल तर जगातील कुठलाही विद्यार्थी आपल्या आयुष्यात यशस्वी होतो या विषयी विविध उदाहरणे सांगून क्रीडाप्रेमी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेसाठी पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे डॉ उमेशराज पन्हेरु – सचिव, डॉ रमेश गायकवाड – सिनेट सदस्य, शा. शि. अभ्यास मंडळ अध्यक्ष, प्रा आशिष तळेकर- सहसचिव, प्रा पौर्णिमा कारळे – सहसचिव, डॉ भरत भुजबळ – शा. शि. अभ्यास मंडळ सदस्य, कॅप्टन डॉ रावसाहेब गरड एन.सी.सी. अभ्यास मंडळ सदस्य, प्रा. अतुल पानसरे मुख्याध्यापक- राजा शिवछत्रपती विद्यालय तसेच सहभागी महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख इत्यादी मान्यवर आणि महाविद्यालयातील डॉ. पांडुरंग मिसाळ, श्री. प्रवीण भावे प्रा. शाहुराज येवते. प्रा. कैलास अस्तरकर, प्रा. परमेश्वर भत्ताशे, प्रा. पारप्पा दुपारगुडे, प्रा. शैला वाळुंज, डॉ. छाया जोशी, प्रा. दिपाली ताम्हाणे, प्रा. सविता मानके, प्रा. यशोदा खुळखुळे, प्रा. समीना मोमीन, प्रा. दिपाली सोनवणे, प्रा. प्रीती बुन्हाडे, प्रा. प्रेरणा पाटील, प्रा. सोनाली अभंग, प्रा. पूजा राणे, प्रा. पूजा खवले, सौ. वर्षा ताजणे, कु. नेहा लांडगे इत्यादी सर्व विभागाचे विभाग प्रमुख, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, खेळाडू विद्यार्थी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार मा. श्री. मयूर मुरलीधर ढमाले यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिलीप बारी यांनी केले तर उपस्थितांचे आभार शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. विकास दिघे यांनी मानले अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा. माणिक कसाब यांनी दिली