अनुभवी फॅसिलिटेटर आणि प्रशिक्षक चंद्रा पुलमारसेट्टी, माजी कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह, संस्थापक, बुद्ध-सीईओ क्वांटम फाउंडेशन. यांचे होणार मार्गदर्शन
शबनम न्यूज प्रतिनिधी :
प्रत्येक व्यक्तीला वाटते आपले जीवन हे तणावमुक्त राहावे,आनंदी राहावे आपण आनंदी जीवन जगावे पण प्रत्येक व्यक्तीला आनंदीमय जीवन जगणे शक्य होत नाही, जीवनात अनेक अडीअडचणी असतात या अडी अडचणींचा सामना करताना मनुष्याला अनेक वेदना होत असतात,प्रत्येक व्यक्ती हा तणाव मुक्तीच्या शोधात, आनंदाच्या शोधात असतो यासाठीच पुण्यामध्ये पिरॅमिड ध्यान प्रचार फाउंडेशन व अनन्या फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत ध्यान कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यशाळेत अनुभवी फॅसिलिटेटर आणि प्रशिक्षक चंद्रा पुलमारसेट्टी, ( माजी कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह,
संस्थापक, बुद्ध-सीईओ क्वांटम फाउंडेशन ) यांचे मार्गदर्शन राहणार आहे.सदर कार्यशाळेत प्रवेश विनामूल्य आहे.सदर कार्यशाळा शनिवार दिनांक 7 ऑक्टोबर रोजी पुण्यामधील महात्मा फुले सांस्कृतिक भवन,फातिमानगर, वानवडी येथे सकाळी साडेअकरा ते दुपारी दोन वाजे दरम्यान संपन्न होणार असून या कार्यशाळेत जास्तीत जास्त नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शवावी असे आवाहन अनन्या फाउंडेशनच्या अध्यक्ष वृषाली ऋषिकेश दाभाडे यांनी केले आहे.
आपल्या सर्वांना स्वप्न आहेत आपल्या सर्वांचे जीवनात काही मोठ्या आशा आकांक्षा आहेत या अशा आकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून मानवाने पावले उचलायला हवी, तणावमुक्ती आयुष्यासाठी स्पष्टता आणि वैयक्तिक विकासासाठी प्रत्येक व्यक्तीने या कार्यशाळेत उपस्थित राहून अनुभवी फॅसिलिटेटर आणि प्रशिक्षक चंद्रा पुलमारसेट्टी, ( माजी कॉर्पोरेट एक्झिक्युटिव्ह,संस्थापक, बुद्ध-सीईओ क्वांटम फाउंडेशन ) यांचे विचार, यांचे मार्गदर्शन एकदा तरी ऐकायलाच हवे या दृष्टिकोनातून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती वृषाली दाभाडे यांनी दिली आहे तसेच कार्यक्रमानंतर उपस्थितितांसाठी स्नेहभोजनाचेही आयोजन करण्यात आले असल्याचे वृषाली दाभाडे यांनी सांगितले हा कार्यक्रम विनामूल्य असल्याने याची नोंदणी करणे आवश्यक आहे याकरिता ऑनलाइन नोंदणीसाठी पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहे हा विनामूल्य कार्यक्रम आहे,
पूर्व नोंदणी येथे करणे गरजेचे आहे @ https://www.buddhaceo.org/intropune
या कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या नंबर वर ही संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी कृपया कॉल करा:
केतकी: +९१ ८६२५९ २४९४४
चंद्रगुप्ता: + ९१ ८७८८९ ९६५८२
हृषीकेश: +९१ ९८२०२८८७८९
दिनेश: +९१ ९९२३६ ९५३८८
निलांजन: +९१ ८४२०० ९८३३६
तरी सदर कार्यक्रमास नागरिकांनी आपल्या सह कर्मचारी,मित्रपरिवार यांच्यासह उपस्थित राहण्याचे ही आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.