शबनम न्युज | ताथवडे
पिंपरी चिंचवड मध्ये अवैधरित्या गॅसची चोरी करून स्फोटास, मानवी जीवितास व मालमत्तेस नुकसान करण्यास कारणीभूत असलेल्या तीन आरोपींना वाकड पोलिसांनी अटक केली आहे. महिपाल चौधरी (रा. साई पॅराडाईज, पुनावळे) , राहुल कुमार राजदेवराम (रा. थेरगाव) चंद्रकांत महादेव सपकाळ (रा. जे एस पी एम, कॉलेज जवळ ताथवडे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या विरोधात भा.द.वि. कलम 389 407 285 336 427 34 व जीवनावश्यक वस्तू अधिनियम कलम 3/7स्फोटक पदार्थ अधिनियम 1908 चे कलम तीन चार प्रमाणे कायदेशीर तक्रार दाखल करण्यात आली आहे.
काल रविवार दि. ८ ऑक्टोबर 2023 रोजी जेएसपीएम कॉलेज परिसर ,ताथवडे येथे मोठ्या प्रमाणात आग लागल्याची घटना घडली होती. घटनास्थळी पोलिसांनी त्वरित धाव घेतली. नंतर एम एन जी एल फायर बिग्रेड यांना कळवून योग्य ती उपाययोजना करण्यात आली होती. या घटनेचा तपास केला असता, गॅसचे टँकर नोजल पाईप द्वारे गॅस चोरून, व्यावसायिक गॅस टाक्या भरण्याची चालू असताना गॅस लीक झाल्याने स्पोर्ट होऊन मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे निष्पन्न झाले. सदर आगीमध्ये जे एस पी एम कॉलेज आवारात पार केलेल्या ब्लॉसम स्कूलचे 3 स्कूल बस गॅस चा टँकर गॅस सोडून नेण्यासाठी सिलेंडर असलेला टेम्पो इत्यादी जळून नुकसान झालेले होते.
या सर्व घटनेचा तपास केला असता, या घटनेतील आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हा केल्याचे आरोपींनी गुन्ह्याची कबूरी देखील दिली आहे.