शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपल्या महानगरपालिकेच्या ४१ व्या वर्धापनदिना पूर्वी बोनस व सानुग्रह अनुदानाचे परिपत्रक काढून कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करावी अशी मागणी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाच्या वतीने दिनांक 05/10/2023 रोजी मा. आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली होती. सदर विषयाबाबत काल दिनांक 09/10/2023 रोजी मा. आयुक्त व महासंघाचे पदाधिकारी यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा होऊन सोमवार, दिनांक 09/10/2023 रोजी बोनस व सानुग्रह अनुदानाबाबतचे परिपत्रक प्रशासन विभागामार्फत निर्गमित करण्यात आले. दीपावली सणानिमित्त बोनस व सानुग्रह अनुदानाची रक्कम वेळेत मिळणार असल्यामुळे महानगरपालिकेतील सर्वच अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. याप्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष श्री. शशिकांत उर्फ बबनराव झिंजुर्डे, मनोज माछरे, नितीन समगीर आदी पदाधिकाऱ्यांनी मा. आयुक्त व प्रशासन विभागाचे आभार व्यक्त केले