शबनम न्यूज | प्रतिनिधी :
पिंपरी : नवरात्र उत्सवानिमित्त उत्साहाचे वातावरण आहे या नवरात्र उत्सवानिमित्ताने शहरात ठिकठिकाणी मंडप उभारणी केली जाते, या मंडप उभारणी करीता महानगरपालिका वतीने शुल्क आकारले जाते ,सदरचे शुल्क आकारले जाऊ नये ,गणेशोत्सवात ज्याप्रमाणे महानगरपालिका वतीने शुल्क आकारले गेले नाही तसेच नवरात्र उत्सवानिमित्त मंडप उभारणीचे शुल्क आकारले जाऊ नये अशी मागणी राष्ट्रवादीचे शहर युवक अध्यक्ष शेखर काटे यांनी मनपा आयुक्तांकडे केली होती, त्यांच्या या मागणीची दखल घेत महानगरपालिका प्रशासन वतीने पिंपरी चिंचवड शहरातील नवरात्र उत्सवानिमित्त उभारलेल्या मंडपाचे शुल्क आकारले जाणार नाही सदरचे शुल्क मनपा प्रशासन वतीने माफ करण्यात आले असल्याचे प्रशासन वतीने कळविण्यात आले आहे
Advertisement