राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक चंद्रकांत वाळके व युवक शहराध्यक्ष इमरान शेख यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम
शबनम न्यूज | प्रतिनिधी :
पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक चंद्रकांत वाळके व युवक शहराध्यक्ष इमरान शेख यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक शहर सचिव प्रशांत काळेल यांच्या वतीने दत्तनगर दिघी येथे येथील स्नेह छाया अनाथ आश्रम येथील लहान मुलांना पुस्तकांचे वाटप करून भेटवस्तू देण्यात आली वाचनीय पुस्तके मिळाल्याने अनाथ आश्रमातील लहान मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला.
आजच्या काळात पुस्तकांचे वाचन कमी झाले आहे, मोबाईल मुळे वाचनाची आवड कमी होत आहे, पुस्तकांच्या वाचनामुळेच आपल्या बुद्धिमत्तेची वाढ होत असते ,लहान मुलांवर पुस्तकांच्या वाचनांमुळेच चांगले संस्कार घडत असतात, लहान मुलांना वाचनाची आवड निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून प्रशांत विवेकानंद काळेल यांनी हा उपक्रम राबविला.
यावेळी दिघीतील सर्व राष्ट्रवादी प्रेमी संदीप भाऊ बिराजदार,पी एन म्हात्रे सर,रमेश सायकर साहेब ,अभिमन्यू भाऊ दोरकर, धनंजय मामा खाडे, लालासाहेब जगताप, चेतन भाऊ करचे,अशोक भाऊ पंडित, परशुराम भाऊ चोरघे,सौ.पल्लवी ताई काळेल, सौ मनीषा ताई जढर,सौ.पल्लवी ताई चोरघे,शिंदे ताई आदी उपस्थित होते.