शबनम न्यूज | प्रतिनिधी :
पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मुख्य प्रशासकीय इमारत पिंपरी येथे झालेल्या या कार्यक्रमास मुख्य सुरक्षा अधिकारी मेजर उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, आपत्ती व्यवस्थापन प्रमुख ओमप्रकाश बहिवाल, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच पालिका कर्मचारी उपस्थित होते.
Advertisement